दररोज AC च्या हवेत झोपलात तर होईल हा त्रास; करून पाहा सोपे उपाय
एअर कंडिशनरची (Air conditioner) हवा हवीहवीशी वाटली तरी त्वचेवर वाईट परिणाम करणारी आहे.
|
1/ 10
AC जितका आराम देतो तितकंच त्वचेचं नुकसानही होऊ शकतं. जास्त वेळ एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते. घर किंवा ऑफिस,रेस्टॉरंट किंवा मॉल कुठेही AC असल्यामुळे बहुतेक वेळा लोकांचा एसीमधला वावर वाढलेला आहे.
2/ 10
जास्त वेळ एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते. कोरडेपणा दूर करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याआधी घरगुती उपाय करावेत.
3/ 10
त्वचेचा कोरडेपणापासून बचाव करण्यासाठी तीळ तेलाचा वापरू शकता. यासाठी, एक चमचा तीळ तेलामध्ये एक चमचा साय मिसळा आणि चांगले मिक्स करा. या मिश्रणाने दररोज आपल्या त्वचेची 10 मिनिटं मॉलिश करा आणि नंतर त्यास साध्या पाण्याने धुवा.
4/ 10
साय लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन चांगलं होतं. एसीमध्ये बराच वेळ घालवत असाल तर दररोज झोपण्याआधी चेहरा आणि हात पायाला सायीने मॉलिश करा.
5/ 10
AC मध्ये जास्त वेळ घालवल्यानंतर त्वचेला आलेला कोरडेपणा घालवण्यासाठी मध आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी,एका चमचा मधात 4 ते 5 थेंब लिंबाचा रस मिसळा. ते मिश्रण आपल्या त्वचेवर लावा आणि पाच मिनिट मॉलिश करून धुऊन टाका.
6/ 10
दुधाच्या सायीत गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब टाकले तर, आणखीन फायदा होतो.
7/ 10
AC मध्ये जास्त वेळ घालवल्यानंतर त्वचेला आलेला कोरडेपणा घालवण्यासाठी मध आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी,एका चमचा मधात 4 ते 5 थेंब लिंबाचा रस मिसळा. ते मिश्रण आपल्या त्वचेवर लावा आणि पाच मिनिट मॉलिश करून धुऊन टाका.
8/ 10
एक केळं सोलून चांगलं मॅश करा. त्यात एक चमचा मध मिसळा. दोन्ही मिक्स करुन घ्या. ही पेस्ट त्वचेवर 20 मिनिटांसाठी लावा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
9/ 10
रात्री बदामाच्या तेलाने त्वचेवर मॉलिश करा. यामुळे कोरडी त्वचा मऊ बनेल.
10/ 10
काही थेंब ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चेहऱ्यावर लावा.