तेलाचे जादुई फायदे! त्वेचेचं सौंदर्य वाढेल; अनेक आजार पळतील दूर
स्वयंपाकात वापरलं जाणारं जायफळ, सौंदर्य प्रसाधनं आणि औषधांमध्येही वापरलं जातं. जायफळ तेलाचेही (Nutmeg-Oil) बरेच फायदे आहेत.
|
1/ 9
मिरिस्टिका वृक्षच्या बी ला जायफळ असं म्हणतात. जायफळाचा वापर जेवणात करतात. जायफळ तेलाचाही वापर आयुर्वेदात केला जातो.त्वचेसंबंधी समस्या,आरोग्यासंबंधी त्रासांवर जायफळ एक गुणकारी औषध आहे.
2/ 9
जायफळात फायबर, थियामिन, व्हिटॅमीन बी 6, फॉलेट, कॉपर, मॅक्लिग्रॅन, मॅग्नेसिअम सारखे पोषक तत्व असतात. जायफळ तेल औषधांमध्ये आणि कॉस्मेटिकमध्ये वापरलं जातं.
3/ 9
जायफळ मध्ये ऍन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुशे तोंडाची दुर्गंधी कमी होते. त्यामुळे याच्या तेलाचा वापर टुथपेस्टमध्ये केला जातो. जायफळात ऍन्टीइमफ्लामेंन्ट्री गुण असतात. पाण्यात काही थेंब टाकून गुळण्या केल्याने हिरड्याचा सुज कमी होते आणि दात दुखीही कमी होते.
4/ 9
जायफळ तेल स्ट्रेस आणि ऍन्जायटीचा त्रास कमी करतं. जायफळ तेलाचा वापर आरोमा थेरिपीमध्ये केला जातो. त्याचा वापर डिफ्युजर मध्ये टाकून केला जातो.
5/ 9
जाफळ तेलाचा वापर मसालेदार पदार्थ, मिठाई किंवा बेकरी प्रोडक्टमध्ये केला जातो. जायफळाने पदार्थाची चव वाढते.
6/ 9
सांध्याना सुज आलेली असेल तर, जायफळ तेल लावावं. जायफळ तेलाने सांध्यांची सुज कमी होते. जायफळ तेलात ऍन्टीइमफ्लामेंन्ट्री गुण असतात त्याने स्नायुंमधील तणाव कमी होऊन दुखणंही कमी होतं.
7/ 9
जायफळ तेल त्वचेच्या सौंदर्य वाढवतं. जायफळ तेलाचा वापर एसन्सेशिअल ऑईल मध्ये केला जातो. हे तेल आंघोळीच्या तेलातही वापरलं जातं.
8/ 9
यात ऍन्टीऑक्सिडंटचा मात्र भरपूर असते. त्यामुळे त्वचेसाठी उपयुक्त असतं. जायफळ तेलाने चेहऱ्यावरील सुरुकुत्या, चेहऱ्यावरील डाग आणि काळी वर्तूळं कमी होतात.
9/ 9
जायफळ तसं प्रकृतीला गरम आहे. जास्त वापराने त्रास होऊ शकतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी,चक्कर येणं, त्वचेवर लाल चट्टे येणं, तोंड सुकणं असे त्रास होऊ शकतात.