जगभरातील कोट्यवधी लोक जीवघेण्या परिस्थितीत जगत आहेत. एवढंच नहीतर त्यांना स्वतःला होणाऱ्या त्रासाची जाणीवही नसते. 'द लॅन्सेट' मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार. उच्च रक्तदाब हा आजार एखाद्या सायलेन्ट किलर सारखा आहे. या अभ्यासासाठी गेल्या 30 वर्षांमध्ये, उच्च रक्तदाब असलेल्या अर्ध्याहून अधिक लोकांनी अद्याप उपचार केलेले नाहीत असं सांगितलं आहे.
इंपीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक आणि अभ्यासाचे प्रमुख लेखक माजिद इज्झती यांनी द सनला सांगितलंय की, गेल्या अनेक दशकांमध्ये औषधोपचारात इतकी प्रगती असूनही हायपरटेन्शन उपचारांबद्दल परिस्थिती कठीण आहे. हायपरटेन्शन असलेले बहुतेक लोक उपचार घेत नाहीत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये याचे परिणाम दिसतात.
जगभरात हायपरटेन्शनचा त्रास असलेल्या लोकांची संख्या गेल्या 30 वर्षांमध्ये दुप्पट झाली आहे. आपल्या शरीराला विविध अवयवांना रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी रक्तदाब असणं आवश्यक असतं. रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. तीव्र डोकेदुखी, प्रचंड थकवा, एन्झायटी, डोळ्यांच्या समस्या आणि छातीत दुखणे ही काही सामान्य लक्षणं दिसतात.