आपल्या स्वयंपाकघरात लिंबू असतोच. बऱ्याच पदार्थांमध्ये लिंबू वापरला जातो. लिंबाने जेवणाची चव वाढतेच आणि लिंबू आरोग्यासाठीही महत्वाचा आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, ई, बी, थायमिन, नियासिन, राइबोफ्लेविन आणि फॉलेटसारखे अनेक पोषक घटक असतात.
2/ 8
लिंबूपाणी पचनाची समस्या कमी करण्यात खूप मदत करतं. हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पित्ताची निर्मिती वाढवतं. ज्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता,अपचन यासारख्या समस्यांमध्ये दिलासा मिळतो.
3/ 8
रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात याचा खूप फायदा होतो. त्यातील व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं. रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्यामुळे शरीरात पोषकद्रव्यं अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात. त्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी असतो.
4/ 8
रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामध्ये भरपूर लिंबूवर्गीय अॅसिड आणि व्हिटॅमिन-सी असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.
5/ 8
रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेण्याने वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो. याने मेटाबॉलिजम वाढवतं आणि चरबी घटते. याशिवाय,शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास देखील मदत करतं,त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
6/ 8
लिंबूपाणी पिण्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि शरीरात पाण्याची कमतरता दूर होते. त्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे उष्णतेपासून बचाव होऊन शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते.
7/ 8
लिंबू पाण्याने त्वचा निरोगी राहण्यासही मदत होते. कोलेजन तयार करण्यासाठी त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी खूप चांगलं मानलं जातं. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
8/ 8
यकृताचं आरोग्य चांगलं राखण्यासही मदत होते. यामुळे यकृत शुद्ध राहतं तसंच यकृतची ऊर्जा रिस्टोर होते आणि त्यामुळे रात्रभर अॅक्टिव्ह राहतं.