गुलाब-गुलाबाच्या फुलामध्ये विटामिन ए, बी आणि सी असतं गुलाबाच्या फुलाच्या रसाचा उपयोग उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळवण्यासाठी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी केला जातो. गर्भवती महिलांसाठी आणि पोटासाठी देखील गुलाबाची फुलं चांगली असतात. गुलाबाच्या फुलांचा गुलकंद लोक आवडीने खातात. यामुळे पचनाच्या समस्या कमी होतात, खोकला, दमा किंवा हृदयाशी संबंधित समस्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या वापराने बऱ्या होतात.