रोज बडीशेप खाणं फायदेशीर; युरीन इन्फेक्शनशिवाय या आजारांवर ठरेल गुणकारी
मसाल्यापासून ते माउथ फ्रेश्नर म्हणून बडीशेप वापरली जाते. बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. बडीशेपने त्वचेच आरोग्यही सुधारतं. स्तनांचा आकार वाढण्यातही त्यामुळे मदत होते.
बडीशेपमध्ये (Fennel) कॅल्शियम, सोडियम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशियमसारखे तत्त्व आरोग्यासाठी खूप चांगली असतात. बडीशेप खाल्ल्याने स्मरणशक्तीही वाढते. दररोज बडीशेप खाल्ल्यास दृष्टी चांगली होते.
2/ 6
बडीशेपचा वापर त्वचेसाठीही करता येतो. बडीशेपला एक नैसर्गिक सुगंध असतो, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. बडीशेपचा फेस पॅक बनवता येतो. त्यासाठी चार चमचे बडीशेप पावडर, एक केळं, एक चमचा मध आणि गुलाबाचं पाणी घ्या. हे मिश्रण 20 मिनिटं चेहऱ्यावर लावा.
3/ 6
हात किंवा पायांची जळजळ होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्खे धणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. असं नियमित काही दिवस केल्यास हात-पायाची होणारी जळजळ थांबेल.
4/ 6
बडीशेपचा वापर हा छोट्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठी आणि तसंच सुडौल करण्यासाठीही केला जातो. बडीशेपमध्ये फ्लेवोनॉईड अॅस्ट्रोजन नावाचं हार्मोन आढळतं. जे स्तनांचा आकार वाढवण्यात मदत करतं. दूधासोबत बडीशेप खाल्ल्यास स्तनांचा आकार वाढण्यास खूपच फायदा होतो.
5/ 6
युरीन इन्फेक्शन असल्यास बडीशेप खावी. लगेच आराम मिळतो.. उन्हाळ्यात बरेचदा महिलांना युरीनला जळजळ होण्याचा त्रास होतो. त्यावर लगेच आराम मिळण्यासाठी बडीशेपच सेवन नक्की करा.
6/ 6
बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, ज्याचा शरीराला फायदा होतो. त्यामुळे रक्तवाहिन्या लवचिक बनतात. तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)