Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


मुलांच्या आहाराबाबत पालक नेहमीच काळजी करतात. सगळ्यात आयांना वाटतं की त्यांच्या मुलांनी व्यवस्थीत जेवावं. किशोर वयात मुलांची झपाट्याने वाढ होते. या वयात सकस आहाराची जास्त गरज असते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आहारात कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2/ 6


शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुलांनी दररोज रिकाम्या पोटी सहा ते आठ बदाम आणि एक अक्रोड खायला हवं. बदाम आणि अक्रोड हे उर्जेचं भडार असल्यामुळे चयापचयाची क्रिया वाढून सहाय्यक इंजाइम्स तयार होतात.
3/ 6


नाश्ता थोडा हेवी असावा. जेणेकरून दिवसभाराची उर्जा मिळते. त्यात कर्बोदकं आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असायला हवीत.
4/ 6


सकाळच्या नाश्त्यात एक-दोन अंड्यांचा समावेश असावा. अंड्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. शिवाय शरीराला भरपूर प्रमाणाक कॅलरीही मिळतात.