जिममध्ये तासन्तास वर्कआउट - विराट कोहली जिममध्ये जायला कधीच विसरत नाही. करोनामुळे लॉकडाऊन असतानाही तो स्वत:ला कुठल्या ना कुठल्या प्रकारे घरात अॅक्टीव ठेवायचा. त्यावेळी तो त्याच्या सोसायटीमध्येही क्रिकेट खेळायचा. जिम व्यतिरिक्त तो घरी इतर खेळही खेळतो. अलीकडे तो जिममध्ये स्ट्रेंथ-ट्रेनिंग एक्सरसाइज करताना दिसला. या व्यायामामुळे शरीराचे संपूर्ण स्नायू मजबूत होतात. याशिवाय तो सीटेड लेक एक्स्टेंशन करतो. तो वेट लिफ्टिंग, पॉवर क्लीन वर्कआउट्स इत्यादी करत असतो. सिटेड लेक एक्स्टेंशन पायांच्या स्नायूंना बळकट करते, मांडीची चरबी बर्न करते. (छायाचित्र: instagram/virat.kohli)
विराट कोहलीचे फिटनेस सीक्रेट- जेव्हा विराटने क्रिकेट करिअरमध्ये पाऊल ठेवले त्यावेळचा विराट आणि आजच्या विराटमध्ये बरेच बदल झाले आहेत. आज विराट जगभरात फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जातो. पूर्वी त्याचे वजन जास्त होते, परंतु हार्ड वर्कने त्याचे वजन कमी झाले आहे. तो जिममध्ये हाय इंटेन्सिटी कार्डिओ एक्सरसाइज करत असतो. आहारात कमी कार्ब आहार घ्यायचा, हेल्दी फॅट. तंदुरुस्त शरीर, टोन्ड स्नायू बनवण्यासाठी कोहलीप्रमाणेच तुम्ही हेवी वेट लिफ्टिंग करू शकता. (छायाचित्र: instagram/virat.kohli)