थोडे खा, पण हेल्दी खा हिवाळ्यात शरीरात अन्न पचायला वेळ लागतो. म्हणूनच या दिवसात सहज पचणारेच पदार्थ खावे. जास्त तळलेले आणि डब्बाबंद प्रिझर्व फूड केलेले अन्न खाऊ नका. कारण जास्त फॅट असलेल्या गोष्टी तुमचे वजन वाढवतात. हे बर्याचदा चांगल्या दर्जाचे फॅट्स देखील नसतात. त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहामध्येही ते खूप नुकसानकारक ठरतात. म्हणूनच थंडीच्या मोसमात जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून आपले आरोग्यही निरोगी राहते आणि वजनही वाढत नाही.
शरीरात पाण्याची कमतरता हिवाळ्यात आपण अनेकदा पिण्याचे पाणी कमी करतो. या काळात तहानही कमी लागत असली तरी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जेणेकरून थंडीच्या कोरड्या ऋतूत शरीरात आवश्यक आर्द्रता टिकून राहते. यासोबतच योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने विषारी घटक आपल्या शरीरातून बाहेर पडतात. पाणी प्यायल्याने आपली चयापचय क्रियाही निरोगी राहते. याशिवाय पाणी प्यायल्याने आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते आणि तितकी भूकही लागत नाही. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर हिवाळ्यातही पुरेसे पाणी प्यायला हवे.
गरम सूप प्या हिवाळ्यात गरमागरम सूप पिण्याचा आनंद काही खास असतो. आरोग्याच्या दृष्टीने त्याचे अनेक फायदेही असतात. हिवाळ्यात आपल्याला उबदार वाटण्यासोबतच सूपमधून अनेक पोषक तत्वे देखील मिळतात. यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. आपल्याला सूपमधून अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि मिनरल्स मिळतात. ते आपले वजन नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हिवाळ्यात सूपचे सेवन करत राहा.
आले घालून चहा हिवाळ्यात आल्याच्या चहाचे वेगळेपण आहे. चवदार असण्यासोबतच अद्रकामध्ये असे काही घटक आढळतात जे आपल्या शरीरातील रक्ताचा वेग वाढवतात. ते आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण देखील कमी करतात. त्यामुळे हिवाळ्यात आल्याचा चहा घेतल्याने इतर सर्व फायद्यांव्यतिरिक्त वजन नियंत्रणात राहण्यासही खूप मदत होते.
अँटिऑक्सिडंट समृध्द फळे हिवाळ्यात अँटिऑक्सिडंटने भरपूर फळे खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहतेच. उलट वजनही वाढत नाही. जीवनसत्त्वे आणि खनिजांव्यतिरिक्त, अनेक फळे फायटोकेमिकल्सचे चांगले स्त्रोत आहेत. कोलेस्टेरॉलसह तळलेले किंवा स्वादिष्ट पदार्थ खाण्याऐवजी ही फळे खाण्याची सवय लावल्यास निरोगी जीवनशैलीच्या दिशेने ते एक मोठे पाऊल ठरेल.