Home » photogallery » lifestyle » HEALTH NEWS DO NOT STORE THESE 5 FRUITS IN FRIDGE IN MARATHI RP

ही फळं 5 फ्रिजमध्ये ठेवायची चूक इथून पुढं तरी करू नका; पोषक घटक कमी होतात

Do Not Store Fruits In Fridge: ताजी फळे आणि भाज्या खाणे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यातून शरीराला आवश्यक अनेक घटकांचा पुरवठा होतो आणि ते पचायलाही सोपे असतात. पण, उन्हाळ्याच्या दिवसात फळे फ्रीजमध्ये ठेवण्याकडे अनेकांचा कल असतो. लोक काहीही विचार न करता सर्व फळे आणि भाज्या फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रिजमध्ये फळे आणि भाज्या ठेवल्याने त्या जास्त काळ ताज्या राहतील आणि खराब होणार नाहीत, असे तुम्हाला वाटत असेल, पण हा तुमचा गैरसमज असू शकतो. वास्तविक, काही फळे अशी आहेत, जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. marthastivert.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार फ्रिजमध्ये काही ताजी फळे ठेवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य तर कमी होतेच, शिवाय ते आरोग्यासाठी घातक बनतात. जाणून घेऊया कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

  • |