फक्त दोरीउड्या मारून आरोग्याच्या अनेक समस्यांना ठेवू शकता दूर
Skipping rope हा कधीही आणि कुठेही करता येईल असा सहजसोपा व्यायाम आहे.
|
1/ 5
दोरीउड्या हा पूर्ण शरीराचा व्यायाम आहे. यामध्ये तुमचे पाय आणि हातांचा वापर होतो. ज्यामुळे पूर्ण शरीराच्या स्नायूंना त्याचा फायदा होतो. (फोटो- PIXABAY)
2/ 5
रनिंग, सायकलिंग, स्विमिंग यापेक्षा दोरीउड्या हा हृदयासाठी उत्तम असा व्यायाम आहे. यासाठी तुम्हाला महागड्या उपकरणांची गरज नाही. शिवाय तुम्ही घरच्या घरीही करू शकता.
3/ 5
दोरीउड्या म्हणजे आपण एकाच जागी उड्या मारतो, ज्यासाठी भरपूर ऊर्जा लागते. भरपूर कॅलरीज बर्न होतात. परिणामी वजन कमी करण्यासही मदत होते.
4/ 5
एकाच ठिकाणी उड्या मारल्याने फुफ्फुसांचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. श्वासोच्छवासाची प्रक्रिया नीट सुरू राहते.
5/ 5
एका अभ्यासानुसार नियमित काही वेळ उड्या मारल्याने हाडांची घनता चांगली राहते आणि यासाठी दोरीउड्या सर्वात चांगला व्यायाम आहे. मात्र ज्यांना हाडांच्या समस्या आहेत, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.