Home » photogallery » lifestyle » HEALTH BENEFITS OF OKRA IN SUMMER RP

Benefits of Okra: भेंडी आहारात नक्की घ्या; हृदय विकारांवरही दिसून आलेत चांगले परिणाम

Benefits of Okra : बाजारात विविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात, त्यातील एक अतिशय कॉमन भाजी म्हणजे भेंडी. ही भाजी चविष्ट असल्याने तिला प्रत्येक हंगामात मागणी असते, त्यात असणारे गुणधर्मही तितकेच फायदेशीर आहे. वेबएमडीच्या माहितीनुसार, भेंडीमध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात, जी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन के रक्त प्रवाह चांगले ठेवते आणि रक्त गोठण्यास मदत होते. त्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळतात, वजन कमी करण्यासाठी तिचा फायदा होतो.

  • |