Jewellery Health Benefits : सौंदर्य वाढवून आरोग्यही सांभाळतात मराठमोळे दागिने! पाहा प्रत्येकाचे विशेष महत्व
सणाला महिला अस्सल मराठमोळे दागिने घालून शृंगार करतात. इतर दिवशीही स्त्रिया काही दागिने नियमित वापरतात. आज महित तुम्हाला त्या प्रत्येक दागिन्याचे आरोग्य फायदे काय आहेत हे सांगणार आहोत.
'महाराष्ट्र दिनमान'मध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्त्रिया लावत असलेल्या कुंकू किंवा टिकली हे आज्ञाचक्राला सक्रिय ठेवते. दोन्ही भुवयांच्या मधोमध कुंकू लावल्याने मानसिक शक्ती व स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते अशी मान्यता आहे.
2/ 9
स्त्रियांच्या डाव्या नासिकेतून जाणार्या काही रक्तवाहिन्या गर्भाशयाशीसुद्धा जोडलेल्या असतात. त्यामुळे ह्या बिंदूवर टोचवून नथ घातल्यास प्रसूतीपीडा कमी होतात, बाळंतपणात जास्त त्रास होत नाही आणि प्रजननाशी संबंधित अवयव सुदृढ राहतात असेही मानले जाते.
3/ 9
मंगळसूत्र सोन्याचे असते काहीवेळा त्यामध्ये चांदीचाही वापर होतो. या दोन्ही धातूंमुळे स्त्रियांचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते, रक्तदाबाचा धोका कमी होतो, रक्तदाब असल्यास तो नियंत्रणात राहतो.
4/ 9
त्याचबरोबर गळ्यात घातल्या जाणाऱ्या इतर दागिन्यांमुळेही आपल्याला फायदा होऊ शकतो. या दागिन्यांमुळे गळ्याच्या विशिष्ट भागावर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज टिकून राहते, गलगंड व मानेखालची हाडे यांच्यावर पडणारा वाईट प्रभाव कमी होतो.
5/ 9
अनेक स्त्रिया काचेच्या बांगड्या वापरतात. काचेच्या बांगड्या स्त्रियांच्या काही रोगांवर फायदेशीर असतात. यामुळे चेहर्यावर तेज येते, दात दुखणे, रक्तदाब, बोबडेपणावर फायदा होतो. बांगडी मनगटावर घासल्याने रक्तप्रवाहही वाढतो.
6/ 9
बाजूबंद घालण्याचीही विशेष फायदे असतात. बाजूबंद हृदयाची कार्यक्षमता वाढवते, खांदा आणि हाताच्या वेदनेपासून सुटका करतात. त्याचबरोबर असेही मानले जाते की, बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते.
7/ 9
अशी मान्यता आहे की, कंबरपट्टा घालणार्या महिलांची पचनशक्ती वाढते, मासिक पाळीत अडचणी येत नाही, कंबर दुखणे, पाठदुखी हे त्रासही कमी होतात.
8/ 9
पायातील चांदीचे पैंजण हाडे मजबूत करतात. तसेच चांदीच्या शीतलतेमुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि पैंजणांमुळे मासिक पाळीमध्ये होणार्या वेदनाही कमी होतात.
9/ 9
लग्न झाल्यापासून स्त्रिया पायांच्या बोटात जोडवी घालतात. यामुळे हार्मोन सिस्टीम योग्यरीत्या कार्य करते, थायरॉइडचा धोका कमी होतो. जोडवी अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात, ज्यामुळे शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात.