त्वचेसाठीच नाही आरोग्यासाठीही फायदेशीर आहे गुलाब, वाचा चमत्कारिक फायदे
गुलाबचे आरोग्य फायदे म्हंटल की बहुतेक लोकांना केवळ त्वचेसाठी गुलाबजल हेच आठवेल. मात्र तुम्हाला माहितीये गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले गुलकंददेखील आपल्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसते.
बरेच लोक गुलकंदाचा नियमित वापर करतात. माऊथ फ्रेशनर म्हणून पानमध्येही याचा वापर होतो. मात्र याचे केवळ इतकेच फायदे नाहीत. आज आम्ही तुम्हाला गुलकंदाचे काही अद्भुत फायदे सांगणार आहोत.
2/ 7
गुलकंद पोटाशी संबंधित अनेक आजारांवर प्रभावी आहे. गुलकंद पोटात तयार होणारे पीएच संतुलित करते आणि यामुळे गॅस, ब्लोटिंग, अॅसिडिटी या समस्यांपासून आराम मिळतो.
3/ 7
गुलकंदच्या पाण्याने शरीरातील वात आणि पित्त यांचे संतुलन राखले जाते. यामुळे गॅस, पायाची जळजळ आणि खाज येण्याच्या तक्रारीपासूनही आराम मिळतो.
4/ 7
गुलकंदमध्ये भरपूर अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. ज्यांच्यामुळे आतड्यांतील बॅक्टेरियांना चालना मिळते आणि मुरुम कमी होण्यास मदत होते.
5/ 7
तुमच्या शरीरात खूप हिट असेल तर रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद दूध प्या. हे दोन्ही नैसर्गिक शीतलक आहेत. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि तणाव, थकवा दूर होईल.
6/ 7
गुलकंद तुम्हाला उर्जा वाढवण्यास मदत करते कारण त्यात साखरेचे प्रमाण आहे. द हेल्थ साईटमध्ये सांगितल्यायप्रमाणे आयुर्वेदानुसार, गुलाबाच्या पाकळ्या माणसाला शारीरिक संबंधांसाठी सक्रिय वाटण्यासही मदत करतात.
7/ 7
पाहिलं लोक गुलकंदाचे सेवन उन्हाळ्यातच करतात. मात्र काही लोकांचे म्हणणे आहे की रोज गुलकंद खाणे शरीरासाठी चांगले असते. रात्रीच्या आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्ही फक्त अर्धा चमचा गुलकंद घेऊ शकता. मात्र तुम्हाला कोणताही त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.