दररोज 1 अंड खाणं आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानलं जातं. अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,व्हिटॅमीन आणि खनिजे असतात पण, कार्बोहायड्रेट कमी असतात. 1 अंड खाल्ल्याने वजन वाढत नाही. शिवाय आपलं आरोग्यही निरोगी राहतं.
2/ 8
अंड्याबरोबर काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर वाईट परिणाम होता. एलर्जीही होऊ शकते. हे पदार्थ आणि अंड एकत्र खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी शरीरावर टॉक्सिन वाढू शकतात.
3/ 8
मांसाहारी लोक ब्रेकफास्टमध्ये अंडी आणि बेकन आवडीने खातात. पण, बेकन आणि अंड एकत्र खाल्ल्यामुळे सुस्ती आणि डलनेस येऊ शकतो. बेकन आणि अंड्यात हाय प्रोटीन आणि चरबीही जास्त असते त्यामुळे शरीरात जड आणि सुस्त वाटायला लागतं.
4/ 8
साखर कधीच अंड्यांबरोबर वापरू नये. हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. या दोन्हीमध्ये अमिनो ऍसिड असतं.
5/ 8
ज्यामुळे एकत्र माणसाच्या शरीरात गेलं तर, त्याचं टॉक्सिनमध्ये रुपांतर होतं. यामुळे रक्तामध्ये गुठळ्याही होऊ शकतात.
6/ 8
सोया मिल्क आणि अंडी एकत्र कधीही खाऊ नयेत. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. यामुळे शरीरात प्रोटीन शोषून घेण्यात समस्या येतात.
7/ 8
बरोच लोक सकाळच्या वेळी अंड खातात आणि चहा देखील घेतात. सकाळी अंड खाणं फायदेशीर असत.पण, चहा घेतल्यानंतर लगेच अंड खाल्ल्यास टॉक्सिन तयार होतात.
8/ 8
यामुळे आपल्या पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.