टोमॅटो खाण्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर होऊ शकते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन ई, थियामिन, निआचिन, व्हिटॅमीन बी6, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर यासारखे पोषक घटक असतात. याबरोबरच फायबर व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन के पोटॅशियम आणि मॅग्निज असतं.