New Year 2021: ... छोटीसी आशा! कोरोनाच्या संकटकाळात अपेक्षा जिवंत ठेवतात, पाहा हे 17 PHOTO
Happy New Year 2021 : कोरोनाच्या (Coronavirus pandemic) महासंकटात अशा काही माणुसकीच्या बेटांमुळे आणि मुक्या प्राण्यांच्या निरागसतेमुळे नव्या वर्षाच्या आशा कायम राहिल्या. 2020 या क्षणांसाठीच आपण लक्षात ठेवू या. आवर्जून पाहावेत अशा Best moments of 2020


आपले पार्टनर गमावलेले दोन पेंग्विन. या फोटोसाठी Tobias Baumgaertner याला Oceanographic मॅगझिनकडून 'Ocean फोटोग्राफ ऑफ द इअर' हा पुरस्कार मिळाला होता.


2021 कडून असलेली हीच खरी आशा! UAE मधील महिलांचे डॉक्टर समीर चीअब यांनी या फोटो सोशल मीडियावर टाकला असून खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. Photo: Facebook/Dr Samer Cheaib


केंद्र सरकारच्या शेती कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. पोलीस आणि प्रशासन या शेतकऱ्यांना पुढे जाण्यास परवानगी देत असून इतक्या थंडीत शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. या फोटोत काहीवेळापूर्वी त्यांच्याशी वाद घालणाऱ्या पोलिसांना पाणी आणि अन्न देताना शेतकरी दिसून येत आहेत. Photo: Twitter


शेतकरी आंदोलनाच्या सुरुवातीला पोलीस मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करत होते. या फोटोत पोलिसांच्या पाण्याचा मारा करणाऱ्या वॉटर कॅननचा कॉक बंद करण्यासाठी गाडीवर उडी मारणारा आंदोलनकर्ता दिसून येत आहे. पोलीस त्याच्याजवळ गेल्यानंतर गाडीवरून उडी मारतानाचे हे दृश्य आहे. Photo: Twitter


दिल्लीमधील रिक्षा चालकाचा कमल सिंग हा मुलगा असून त्याला लंडनमधील English National Ballet School मध्ये प्रवेश मिळाला असून यासाठी तो नागरिकांच्या मदतीने कोर्ससाठी पैसे गोळा करत आहे. या स्कुलचे डायरेक्टर मेस्ट्रो फर्नांडो अगुएलीराशी यांच्याशी झालेल्या भेटीने त्याच्यामध्ये या डान्स प्रकाराविषयी आवड निर्माण झाली असून त्याला नॅशनल लेव्हलवर डान्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. Photo: Twitter/ Kamal Singh


Delhi-Bengaluru 6E 122 या फ्लाईटमधून प्रवास करणाऱ्या या महिलेने ऑक्टोबर महिन्यात इंडिगोच्या विमानामध्ये मुलाला जन्म दिला. Photo: Twitter


झीलमधील ह्युंदाई या चारचाकी वाहनाच्या शोरुमने हा टक्सन प्राईम नावाचा कुत्रा दत्तक घेतला होता. इतकेच नव्हे तर त्याला त्यांनी अधिकृत कर्मचाऱ्याचा देखील दर्जा दिला होता. Photo: Instagram/Hyundai


कोरोनाच्या संकटकाळात बॉलिवूड स्टार सोनू सूद याने अनेक गरजू नागरिकांना घरी जाण्यास मदत केली. प्रवासी मजुरांसाठी त्याने केलेलं कार्य कुणीही विसरू शकणार नाही.


इटलीमध्ये सुरुवातीला कोरोना व्हायरसने मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळं सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. नियमाचं पालन करत आपल्या बाल्कनीमध्ये उभे राहात गाणी म्हणत एकमेकांना पाठिंबा देण्याचं काम करत होते. .Photo: Reuters


विहिरीत पडलेल्या चित्त्याला वाचवण्यासाठी स्वतः वनअधिकारी पिंजऱ्यातून विहिरीत उतरले होते. कर्नाटकमधील मैसूर येथील सिद्धराजू हे अधिकारी बॅटरी आणि मोबाईल जवळ बाळगत कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू केलं. हा फोटो खूप व्हायरल झाला होता. Photo: Twitter


मेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूंनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली. या फोटोत आंदोलनकर्ती महिला पोलिसांसमोर गुडघ्यावर बसलेली दिसून येत आहे. Photo: Twitter/ Dai Sugano


भारतीय जवानांच्या 9-शीख रेजिमेंटच्या गोळीबारात 5 मे 1972 रोजी पाकिस्तानचे सैन्य अधिकारी मेजर मोहम्मद शबीर खान यांचा मृत्यू झाला होता. त्यांना भारतातील जम्मू काश्मीरमधील नौगाममध्ये दफन करण्यात आलं होतं. त्यांच्या कबरीची दुरवस्था झाल्यानंतर भारतीय सैन्यांनी ती व्यवस्थित करत 15 ऑक्टोबरला त्याचा फोटो ट्विटरवर टाकला होता. Photo: Twitter/Chinar Corps


वाइल्डलाईफ फोटोग्राफर सेर्गे गोर्शकोव्ह याने सायबेरियन वाघाचा मन्चुरिअन झाडाला मिठी मारतानाचा काढलेला हा फोटो. या फोटोमुळे त्याला यावर्षीचा सर्वोत्तम वाईल्डलाईफ फोटोग्राफर-2020 हा पुरस्कार मिळाला होता. Photo: Instagram via Sergey Gorshkov


ब्रिटनमध्ये Pfizer लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मार्गारेट किनान या 90 वर्षीय महिलेने पहिला डोस घेतला होता. यावेळी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये परतल्यानंतर डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिचे टाळ्या वाजवत स्वागत केले. Photo: Reuters


क्सिकोमधील दवाखान्यामधील हा फोटो असून कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना इमोशनल सपोर्ट देण्यासाठी हार्ली नावाचा हा श्वान मदत करतो. या ठिकाणी असणाऱ्या न्यूरोसायकॉलॉजिस्ट Dr. Lucia Ledesma या त्याच्या डोळ्यात पाहताना. Photo: AP


महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील बाबाभाई पठाण यांनी दत्तक घेतलेल्या दोन मराठी मुलींची लग्न लावून दिली. यावेळी त्यांनी स्वतःच्या पैशाने हिंदू रीती रिवाजानुसार या मुलींची लग्न लावल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. पत्रकार अरिफ शेख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केल्यानंतर पठाण यांचे राज्यभरात मोठे कौतुक करण्यात आलं होतं.Photo: Twitter/ Arif Shah