Home » photogallery » lifestyle » HAPPY JANMASHTAMI KRISHNA JANMA 2020 TOP 10 KRISHNA TEMPLES VRINDAVAN KRISHNA JANMABHOOMI MATHURA TRANSPG
Janmashtami 2020: देशभरातल्या या 10 मंदिरांमध्ये रात्री 12 वाजता साजरा होणार कृष्णजन्म
देशभरात या 10 मंदिरांमध्ये कृष्णजन्माचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो. या वर्षी Coronavirus च्या भीतीमुळे प्रतिबंध आहेत. पण बहुतेक ठिकाणी ऑनलाईन दर्शनची सोय करण्यात आली आहे. पाहा फोटो.
|
1/ 11
Happy Janmashaकृष्ण जन्माष्टमीला यंदा कोरोनाचं ग्रहण लागलं असल्याने बहुतेक ठिकाणी ऑनलाईन दर्शनाची सोय केली जाणार आहे. दिल्लीचं हे ISKON मंदिर. देशातली सर्वात प्रसिद्ध कृष्ण मंदिरं पाहा स्क्रोल करून.i 2020
2/ 11
वृंदावनचं हे प्रेममंदिर. संध्याकाळी इथे थुईथुई नाचणाऱ्या कारंजांची सजावट असते. कृष्णकथांवर आधारित चित्र या मंदिराच्या भिंतींवर सजली आहेत.
3/ 11
मथुरेचं हे कृष्णराव मंदिर. कृष्ण जन्मभूमीवरचं हे मंदिर देशभरात महत्त्वाचं मानलं जातं. कारण कंसाच्या कारागृहात कृष्ण जन्माला आला त्याच जागी हे उभं आहे.
4/ 11
गुजरातमधलं हे द्वारकाधीश मंदिर. समुद्रकाठी वसलेलं हे द्वारकेचं मंदिर स्वर्गाचं दार समजलं जातं. कृष्णजन्माचा सोहळा इथेही झोकात साजरा होतो.
5/ 11
श्री केशवराज मंदिर, बेट द्वारका (गुजरात). याच ठिकाणी कृष्णाची द्वारका होती आणि श्रीकृष्णाच्या अस्तित्वाने ही जागा पावन झालेली आहे, असं म्हणतात.
6/ 11
बाकें बिहारी मंदिर, वृंदावन (उत्तर प्रदेश) - 1864 मध्ये बांधलेलं हे वृंदावन शहरातलं मंदिर जन्माष्टमीला विशेष सजतं. इथली आरती सुप्रसिद्ध आहे. जन्माष्टमीच्या आरतीसाठी प्रचंड गर्दी होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिबंध आहेत.
7/ 11
मथुरेचं हे द्वारकाधीशाचं सर्वात जुनं मंदिर. काळ्या संगमरवरातली कृष्णमूर्ती बघायला जगभरातून भक्त येतात. शेजारी राधाराणीची पांढरी संगमरवरी मूर्ती आहे.
8/ 11
राजस्थानातल्या जयपूरचं हे गोविंद देवजी मंदिर. जयपूरचे महाराज सवाई राजे जयसिंग द्वितीय यांनी याची स्थापना केली. नक्षीदार खांब आणि वास्तुशैलीसाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे.
9/ 11
हंपीचं हे बाळकृष्ण मंदिर जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण आहे. UNESCO ची ही वर्ल्ड हेरिटेज साइट आहे.
10/ 11
कर्नाटकातल्या उडुपी या समुद्रकाठच्या गावात वसलेलं हे श्रीकृष्ण मठ नावाने ओळखलं जाणारं मंदिर दक्षिण भारतातलं सर्वात प्रसिद्ध कृष्ण मंदिर आहे.
11/ 11
वृंदावनातलं श्री राधा मदन मोहन मंदिर टेकडीवर वसलेलं देखणं मंदिर आहे. वृंदावनमध्ये सर्वात आधी बांधलेल्या मंदिरांपैकी हे एक आहे.