Happy B'Day Manasi naik : मिस नाईक टू मिसेस खरेरा; अशी आहे मानसीची LOVE STORY
गेल्या वर्षीच वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्री मानसी नाईकनं (Manasi naik) प्रदीप खरेरासोबत (pradeep kharera) असलेल्या आपल्या रिलेशनशिपबाबत सर्वांना सांगितलं होतं आणि आज ती त्याच्यासोबत लग्नानंतर पहिला आणि आपला 34 वा वाढदिवस साजरा करते आहे.
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi) नुकतीच मिसची मिसेस झाली आहे. बॉक्सर प्रदीप खरेराशी तिनं लग्न केलं आहे. लग्नानंतर ती आपला पहिला वाढदिवस साजरा करते आहे. हा वाढदिवस तिच्यासाठी खूप खास आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2/ 6
मानसीनं गेल्या वर्षीच म्हणजे 2020 साली आपल्या रिलेशनशिपमध्ये सर्वांना सांगितलं होतं. आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तिनं आपलं प्रेम व्यक्त केलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
3/ 6
मानसीनं प्रदीप खरेरासोबत आपला फोटो शेअर करत आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. मी स्वतःलाच दिलेलं हे सर्वात मोठं बर्थ डे गिफ्ट आहे, असं सांगितलं. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
4/ 6
यानंतर वर्षभरानंतर मानसीनं प्रदीप खरेराशी लग्नही केलं. काही दिवसांपूर्वीच अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पण थाटात तिचा विवाहसोहळा पार पडला. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
5/ 6
अगदी पारंपारिक पद्धतीनं मानसी-प्रदीपचं लग्न झालं. त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यापासून लग्नानंतरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
6/ 6
लग्नानंतर मानसी सासरी हरयाणात गेली आहे. लग्नानंतरही आपली पर्सनल लाइफ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)