नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. नवा ड्रेसमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्याची अनेकांचाा प्रयत्न असतो.
2/ 8
गुढी पाडव्यासाठी साडी ऐवजी एखादा ड्रेस खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये काय नवीन ट्रेन्ड आहे हे माहिती हवं.
3/ 8
मुंबईतील दादर मार्केटमध्ये दरवर्षी पाडव्या निमित्त नवा ट्रेंड पाहयला मिळतो. यावर्षी देखील पाडव्यासाठी खास ड्रेस या बाजारात दाखल झाले आहेत.
4/ 8
मुंबईतील बाजारात यावर्षी पैठणी ड्रेसला चांगली मागणी आहे.
5/ 8
ढणी, पायजमा, कुर्ती असा थ्री पीस सेट असतो. ओढणीवर सुंदर मुनिया किंवा पोपट, मोर, फुलं,पान अशी वेगवेगळी नक्षी जरीने केलेली असते. त्याचपद्धतीची नक्षी पायजमावर असते.
6/ 8
कुर्ती स्लिव लेस मिळते. त्यासोबत स्लीवज मिळतात. तसेच कुर्तीवर सुद्धा सुंदर जरी वर्क केलेलं मिळतं.
7/ 8
1000 रुपयांच्या आत सुंदर पैठणी ड्रेस मिळतात. सिल्वर जरी, गोल्डन जरी असे प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. नक्षी कामामध्ये कॉन्ट्रस्ट रंग वापरलेले असतात त्यामुळे ड्रेस अधिक उठावदार दिसतो.
8/ 8
दादर मार्केटमध्ये या ड्रेसचे विविध प्रकार पाहायला मिळतात. यावर्षीच या प्रकारच्या ड्रेसची फॅशन चर्चेत असल्यामुळे या मार्केटमध्ये खास हे ड्रेस खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करतात.