गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक महिलांची नऊवारी साडीला पहिली पसंती असते. मुंबईतील मार्केटमध्ये या साड्या दाखल झाल्या आहेत. मस्तानी नऊवारी , शाही मस्तानी नऊवारी , डबल काष्टी नऊवारी , सिंगल काष्टी नऊवारी, अशा प्रकारच्या साड्या विविध रंगांमध्ये, डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला हवी त्या साईजची साडी इथं मिळते. या साड्यांवर सुंदर मोर तसंच बुट्टा डिझाईन आहे. या प्रत्येक साडीचा काठही आकर्षक आणि उठावदार आहे. या नऊवारी साडी रेडी टु वेअर आहे. संपूर्ण काष्टा तयार असतो. पदराच्या प्लेट्स तयार करून नेसण्याइतकी ती तयार केलेली आहे. ही साडी 2000 ते 2500 रुपयांच्या आत मुंबईतील दादर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. 15 वर्षांपेक्षा मोठ्या मुली आणि महिलांसाठी ही साडी तयार करुनही मिळते.