कोरोना काळात आधीच अनेकांची नोकरी गेली आहे, त्यात घरात एखाद्याला कोरोना झाला तर उपचारांचा खर्चही न परवडणारा नसतो. अशात मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
2/ 11
कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधं आणि उपकरणांवरील करामध्ये कपात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा केल्या आहेत.
3/ 11
ब्लॅक फंगसवरील औषध एम्फोटेरिसिन (Amphotericin) टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. टोसीलिजुमाब (Tocilizumab) औषधावरीलही कर हटवण्यात आला आहे.
4/ 11
रेमडेसिवीर औषधावरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
5/ 11
ऑक्सिमीटरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के
6/ 11
वैद्यकीय ऑक्सिजन, ऑक्सिजन कन्सन्ट्रेटरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के
7/ 11
व्हेंटिलेटरवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के
8/ 11
कोरोना लशीवर 5 टक्के जीएसटी कायम आहे. त्यात काहीही बदल नाही.
9/ 11
पण कोरोना लशीवरील टॅक्स कायम ठेवल्याने सरकारी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना थेट फटका बसणार नाही. कारण 75 टक्के लस सरकार खरेदी करत आहे आणि त्यावर जीएसटीही बसत आहे.
10/ 11
कोरोना टेस्ट किटवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्के
11/ 11
ही करसवल, नवे दर सप्टेंबर 2021 पर्यंतच लागू असतील.