Home » photogallery » lifestyle » GOLD AND SILVER PRICE TODAY UPDATE GOLD RATE INCREASED ON 11 MARCH 2021 CHECKED LATEST GOLD RATE UP MHPL
पुन्हा महाग झालं सोनं; पाहा किती वाढली Gold Price
Gold and silver price today : सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत.
|
1/ 7
गेले काही दिवस सोन्याचे दर कमी होत होते. पण आज सोन्याचे दर वाढलेले पाहायला मिळाले.
2/ 7
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचांदीच्या किंमती वाढल्याने भारतीय बाजारातही सोनंचांदी महाग झालं आहे.
3/ 7
दिल्लीतील सराफा बाजारात सोनं प्रति ग्रॅम 280 रुपयांनी महागलं आहे.
4/ 7
आजचा सोन्याचा दर प्रति तोळा 45 हजार रुपये झाला आहे. आंततराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढून 1,736.02 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
5/ 7
सोन्याप्रमाणे चांदीदेखील महाग झाली आहे. सलग चौथ्या दिवशी चांदीचे दर वाढले आहेत.
6/ 7
चांदीचा भाव प्रतिकिलो 400 रुपयांनी वाढून 67,400 रुपयांवर पोहोचला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी प्रति किलो 26.33 डॉलर प्रति औंस झाली आहे.
7/ 7
डॉलर कमजोर पडल्याने सोन्याची किंमत वाढली आहे. न्यूयॉर्कमधील कमोडिटी एक्सचेंजच्या मते, डॉलर मजबूत झाल्यास आणि शेअर बाजारात तेजी झाल्यास सोन्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळू शकतं.