संशोधकांचा असा विश्वास आहे की, सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीची कक्षा जेव्हा एकदम व्यवस्थित असते तेव्हा अंटार्कटिकातील बर्फाचे डोंगर आपल्या जागेपासून दूर जाऊ लागतात आणि वितळू लागतात. यामुळे दक्षिण महासागरातून खूप मोठ्या प्रमाणात शुद्ध पाणी अटलांटिकामध्ये मिसळते. अशामध्ये दक्षिण महासागर खारा होण्यास सुरुवात होते तर दुसरीकडे उत्तर अटलांटिकाला ताजे पाणी मिळण्यास सुरुवात होते. (फोटो सौजन्य : Pixabay)
सर्वात पहिलं हिमयुग 2 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झालं होतं. सर्वात शेवटचं हिमयुग जवळपास 30 लाख वर्षांपूर्वी सुरु झालं आणि ते आजही सुरूच आहे. आपण आजही हिमयुगात राहत आहोत हे समजल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. हिमयुगाबाबत रहस्यमय बाब ही आहे की, सौरऊर्जेमधील लहान लहान बदल पृथ्वीच्या जलवायूमध्ये बदल आणू शकतात. (फोटो सौजन्य : Pixabay)