

गरोदर न राहण्यासाठी कंडोम किंवा मग गर्भनिरोधक गोळ्या असे दोनच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. पण या गोळ्यांचे साईड इफेक्ट होतात पण तरीदेखील महिला या गोळ्या खातात. कंडोमची 100 टक्के सुरक्षित नसतं त्यामुळे इच्छा नसताही महिला गर्भवती राहते.


या सगळ्यामुळे खूप त्रास होतो जो सहनशिलतेच्या पलिकडे असतो. असाधारण रक्तस्त्राव आणि डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवतात. यात महिलांची काळजी घेणंदेखील कठीण होऊन बसतं.


त्यामुळे गर्भनिरोधकासाठी गोळ्या आणि कंडोमवर आता अवलंबून राहण्याची गरज नाही तर त्यासाठी आता एक जेल तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे स्पर्म प्रोडक्शन थांबवलं जातं.


शुक्राणु न बनल्यामुळे पुरुषांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही यासाठी या जेलमध्ये टेस्टोस्टेरोनदेखील घालण्यात आलं आहे.


हे जेल जर वापरात आलं तर याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पुरुषांना सेक्सचा नैसर्गिक आनंद घेता येईल.


जर या जेलच्या चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर इसवी सन 1800 नंतर म्हणजेच पहिल्या कंडोमचा शोध लागल्यानंतर पहिल्यांदा पुरुषांसाठी निरोधक तयार करण्यात येईल.


National Institutes of Health (NIH)च्या अनुसार यूएस सरकारतर्फे लवकरच या जेलच्या चाचण्या करण्यात येणार आहे.


पहिल्या चाचणीमध्ये या जेलला पुरुषांच्या पाठीवर आणि खांद्यावर लावण्यात येईल. तुमच्या शरीरावर कुठेही लावलं तरी हे जेल एकसारखंच काम करेल.