Geyser Safety: थंडीत गरम पाण्याने आंघोळ करण्याइतकं सुख कशातच नाही. लोक सहसा गरम पाण्यासाठी गिझर वापरतात. पण गिझरचे असे काही धोके आहेत, ज्याबद्दल सर्वांनाच माहीत असेल असे नाही. बाजारात अनेक प्रकारचे गिझर उपलब्ध आहेत, ज्यामध्ये इन्फ्रारेड, गॅस, पंखे सारखे हिटर आहेत. बंद खोलीत गीझर वापरू नये. पण गॅस गीझरबद्दल बोलायचे झाले तर त्याबाबत काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
अलीकडेच एका स्टेशनरी ब्रँडचे संस्थापक दिव्यांशु असोपा यांनी एक घटना शेअर केली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. दिव्यांशुने लोकांना घरांमध्ये गॅस गिझर लावताना अधिक सावध राहण्यास सांगितले आहे. कारण गॅस गिझरमुळे आंघोळ करताना त्यांची पत्नी बाथरूममध्ये बेशुद्ध पडली आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा प्रकार घडला. मात्र, त्यांनी वेळीच पोहोचून पत्नीला वाचवले. फोटो: दिव्यांशु/ट्विटर
गीझरमध्ये तीन पाईप असतात, ज्यापैकी पाणी आणि गॅससाठी स्वतंत्रपणे दोन इनलेट पाईप्स आणि गरम पाण्यासाठी एक आउटलेट पाईप असतो. गीझर चालू असताना पाइपलाइनमधून गॅस वाहू लागतो. इग्निटर चालू होते आणि गॅसच्या ज्वाला दिसतात, ज्याने पाणी गरम होते. पण गीझर वातावरणातील ऑक्सिजनचा वापर पाणी गरम करण्यासाठी वापरतो.