श्रींच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावं. लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणं टाळावं. संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढण्यात येऊ नये.