गणपतीची तयारी तर तुमची झालीच असेल. आता गणेशोत्सवासाठी मी कसे तयार होऊ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गणेशोत्सव म्हणजे साहजिकच साडी नेसायचा तुम्ही विचार करता असाल. पण साडी नेसूनही इतरांपेक्षा वेगळं दिसायचं आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2/ 9
गणेशोत्सवात पारंपारिक पण थो़डं हटके पद्धतीने तयार व्हायचं असेल तर तुमच्या फेव्हरेट अभिनेत्री तुम्हाला यात नक्कीच मदत करतील. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हा लूक पाहा. अगदी सिम्पल पण कडक. असा लूक तुम्ही कॅरी करू शकता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
3/ 9
काटपदरी साडी नेसायची असेल तर माधुरी दीक्षितसारखा हा लूक तुम्हाला उत्तम दिसेल. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
4/ 9
तुमचं नुकचं लग्न झालं असेल, लग्नानंतर पहिला गणेशोत्सव असेल आणि भरजडी साडी नेसणार असाल, तर कंगना रणौतसारखा लूक कॅरी करू शकता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
5/ 9
अगदी महाराष्ट्रीयन लूक हवा असेल तर काजोलच्या या लूकबाबत तुमचा काय विचार आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
6/ 9
महाराष्ट्रीयन लूकमध्येही एखाद्या महाराणीसारखं दिसायचं असेल तर अंंकिता लोखंडेचा हा लूक उत्तम. लग्नानंतर पहिला गणेशोत्सव असेल तर हा लूक नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
7/ 9
महाराष्ट्रीयन लूक हवा आहे पण अगदी सिम्पल दिसायचं असेल तर उर्मिला मातोंडकरचा हा लूक एक नंबर आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
8/ 9
असाच सिम्पल पण सुंदर लूक सोनाली कुलकर्णीचाही दिसतो आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
9/ 9
साडीतच थोडं ट्रेडिशनल, थोडं स्टायलिश आणि थोडं मॉडर्न दिसायचं असेल तर करिश्मा कपूरचा हा लूक नक्की कॅरी करू शकता. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)