Gandhi Jayanti 2022 : अगदी साधारण राहणीमान असणाऱ्या महात्मा गांधीजींचा आहार कसा होता?
अहिंसेच्या मार्गानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्मा गांधीजींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण त्यांच्या आवडी निवडींना थोडा उजाळा देऊया.
गांधीजींचे विचार कायमच आपल्या आयुष्यात अवलंबण्यासारखे आहेत. गांधीजी त्यांचा आहार कसा ठेवायचे आणि काय खात होते याची उत्सुकता अनेकांना आहे. आपण जाणून घेऊया.
2/ 9
अहिंसेच्या मार्गानं चालणाऱ्या आणि जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा आहारही त्यांच्या राहणीमानानुसार आणि पेहरावासारखाच अगदी साधा होता.
3/ 9
पेढा : गुजरातमध्ये माव्याचा पेढा त्या काळी खूप प्रसिद्ध होता. महात्मा गांधीजींना हा पेढा खूप आवडत होता. गोड खाद्यपदार्थांमध्ये या पेढ्याला पहिली पसंती होती.
4/ 9
दुधी भोपळा : दुधी भोपळ्यात खूप पोषक तत्व असतात असं म्हटलं जातं. बापूंना मात्र दुधी भोपळा उकडून खायला आवडायचा.
5/ 9
बीट आणि वांगी : बापूंचा कायमच सात्विक आहारावर भर होता. त्यांच्या आहारात हिरव्या भाज्यांचं प्रमाण जास्त होतं. उकडलेल्या भाज्यांमध्ये मीठ न घालता ते खायचे. वांगी आणि बीट ते उकडून खायचे.
6/ 9
डाळ-भात : साधं जेवण किंवा एकदम साधा आहार हे नेहमी त्यांचं तत्व होतं. डाळीतून प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट मिळतात त्यामुळे त्यांना नुसती डाळ, वरळ खायलादेखील आवडत असे.
7/ 9
दही-ताक : महात्मा गांधीजींना दही खूप आवडत होते. ताक आणि दह्यामुळे पचन खूप चांगलं होतं असं म्हटलं जातं. याशिवाय शरीरातील दाह कमी करण्यासाठी मदत होते.
8/ 9
बदामाचं दूध : स्वत: साठी बदाम दूध बनविणे आणि पिणे हा महात्मा गांधींच्या रुटीनचा एक भाग होता.
9/ 9
बदामाचा शिरा : बापूंना गोड पदार्थांमध्ये बदामाचा शिरा आणि सुका मेवा खूप आवडायचा.