

मध्य युरोपातील (Central Europe) ऑस्ट्रिया (Austria) येथील एका गावातील लोक येणाऱ्या नव्या वर्षात आपली ओळख बदलणार आहे. ऑस्ट्रियाचं हे गावा जर्मनीच्या सीमेजवळ आहे. कमी लोकसंख्या असली तरी आपल्या नावामुळे हे गाव खूप चर्चेत असतं.


मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रियाचे हे गाव 6 व्या शतकात स्थापित करण्यात आले होते. आता या गावातील लोक आपलं नाव बदलणार आहेत.


नाव बदलण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाच्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात आला आहे. याची पुष्टी स्थानिक महापौरांनी स्वत: केली आहे. ऑस्ट्रियामधील या सुंदर गावाचे नवीन नाव 'Fugging' असेल.


वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, महापौर अँड्रिया होल्झनर यांनी गावाचे नाव बदलत असल्याचे सांगितले. स्थानिक परिषदेने ठरविलेल्या मुद्द्यांवरून नावात बदल होणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली आहे.


नावातील बदल 1 जानेवारी 2021 पासून अंमलात येईल. पूर्वीच्या नावाऐवजी आता हे गाव Fugging म्हणून ओळखले जाईल, स्वत: महापौर अँड्रिया यांनी ऑस्ट्रियाच्या न्यूज ब्रॉडकास्टर OE 24 शी बोलताना याची माहिती दिली.


या गावाची लोकसंख्या केवळ 100 नागरिक इतकी आहे. जेव्हा नाव बदलण्याचा विचार केला त्यावेळी मतदानाने निर्णय घेण्यात आला.


2001 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या फक्त 93 होती. काळ बदलला पण येथील लोकसंख्येमध्ये कोणताही विशेष बदल झाला नाही.