कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक वर्ष 2019-2020 चा दुरुस्ती केलेला किंवा उशीर झालेला आयटीआर भरण्याची मुदत वाढवली गेली होती. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारनं वित्त विधेयक - 2021 नुसार, नियमात बदल केला आहे. यानुसार तुम्ही उशीरा आयकर भरला तर 1 एप्रिल 2021 पासून जास्त विलंब शुल्क द्यावं लागेल.
सध्याच्या नियमानुसार, करदात्याला मुल्यांकन वर्षाचा परतावा मार्च पर्यंत भरण्याची मुभा होती. तेच यानंतर डिसेम्बरपर्यंत भरल्यावर 5000 रुपयांचं शुल्क आणि मार्चच्या शेवटपर्यंत 1000 रुपयांचं शुल्क द्यावं लागत होतं. मात्र आता एप्रिलपासून सुरू झाल्यानं ही सवलत संपुष्टात येणार आहे. करदात्यांजवळ दहा हजार रुपये देत मागच्या वर्षीचा परतावा भरण्याची सुविधा आता मार्चपर्यंत असणार नाही.
केंद्र सरकारने सर्वसामान्य गुंतवणुकदारांना मोठा धक्का दिला आहे. 1 एप्रिलपासून पीपीएफसह (PPF) सगळ्या ठेवींवरील व्याजदरांमध्ये (Interest rates on Investment) मोठी कपात करण्यात आली आहे. सगळ्या ठेवींवरील व्याजदरात सरासरी एक टक्का घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. 1 एप्रिल 2021 ते 30 जून 2021 या तिमाहीसाठीचे हे दर असतील.
1 एप्रिलपासून सेव्हिंग डिपॉझिटवर 3.5%, एक, दोन आणि पाच वर्षांच्या डिपॉझिटवर अनुक्रमे 4.4%, 5%, 5.8% व्याज देण्यात येईल. तसंच पीपीएफवर 6.4 टक्के व्याज मिळेल. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये 7.4 ऐवजी 6.5%, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 ऐवजी 5.9%, किसान विकास पत्रावर 6.9 ऐवजी 6.2% आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 ऐवजी 6.9% व्याज देण्यात येणार आहे.