आता उन्हाळा मागे सरू लागला आहे आणि पावसाळा उंबरठ्यावर आला आला आहे. अशा वातावरणात तहानही फारशी लागत नाही. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आणि बदलतं वातावरण यामुळे शरीरात पाण्याची कमतरता अधिकच निर्माण होणार आहे. तहान लागली नाही तरी आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे, त्यामुळे शरीराला आवश्यक तितकं पाणी कसं जाईल, याची काळजी आपण घ्यायला हवी.
रात्री झोपताना एक ग्लासभर पाणी किंवा पाण्याची बाटली जवळ ठेवा. जेणेकरून रात्री जाग आल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. याशिवाय ज्याप्रमाणे घराबाहेर जाताना आपण पाण्याची बाटली सोबत ठेवतो, तसं घरातही सोबत ठेवा. काम करताना डेस्कवर पाण्याची बाटली समोर असू द्या. जेणेकरून तुमची त्यावर नजर पडेल आणि तुम्ही पाणी प्याल.