खवय्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात जयश्री गवळी यांचा बासुंदी चहा चांगलाच प्रसिद्ध झालाय.
2/ 10
नारायणी बासुंदी चहा असं त्यांच्या स्टॉलचं नाव आहे. या ठिकाणच्या चहा आणि मसाले दुधाची चव कित्येकांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळत असते.
3/ 10
कोल्हापूर महानगरपालिका चौकात मिळणाऱ्या या चहाची आणि मसाले दुधाची चव चाखायला अनेक जण लांबून येतात.
4/ 10
कोल्हापूरच्या सोमवार पेठमधील लक्ष्मी रोडवर जयश्री ताईंच्या सासऱ्यांच्या वडिलांनी हा गाडा सुरू केला होता. तो व्यवसाय आता जयश्री ताई सांभाळतात.
5/ 10
जयश्री यांच्या घरातील परंपरागत हा व्यवसायआहे. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी घरच्या मंडळींना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या शेजारी हा बासुंदी चहाचा गाडा सुरू केला.
6/ 10
सध्या त्यांच्या घरची चौथी पिढी हा व्यवसाय करत आहे.
7/ 10
मोठ्या पातेल्यात हे दूध तापवून 15 मिनिटे ते उकळले जाते. त्यानंतर त्यात चहा पावडर, साखर, घरीच तयार केलेला चहाचा मसाला टाकला जातो.
8/ 10
आमची वेगळी पद्धत म्हणजे हा चहा आटवून बनवला जातो. उकळायला ठेवलेले कोरे दूध आटल्या शिवाय आम्ही त्यात चहा पावडर टाकत नाही. असे केल्यानेच त्या चहाला बासुंदी चहाचे रूप येते, असे जयश्री यांनी सांगितले.
9/ 10
एका वेळी 6 लिटर दुधाचा चहा बनवला जातो. तर, दररोज 20 ते 25 लिटर दूध लागते. तसेच मसाले दूधाची देखील 20 ते 30 लिटर विक्री रोज होते.
10/ 10
या बासुंदी चहाची किंमत 10 रुपये. तर मसाले दूधाची किंमत 10, 20 आणि 30 रुपये आहे.