लो- बजेटची जेव्हा चर्चा होते तेव्हा आपसूक राजस्थानचं नाव समोर येतं. कमी किंमतीत फिरण्यासाठी राजस्थानमधलं उत्तम ठिकाण म्हणजे जयपूर. जयपूरमध्ये 500 रुपये दिवसाप्रमाणे अनेक हॉटेल उपलब्ध आहेत. तसेच छोट्या हॉटेलमध्ये एका व्यक्तिचा जेवणाचा खर्च 100 ते 200 रुपयांमध्ये होतो. इथे फिरण्यासाठी तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकता. हा खर्च ही 200 ते 300 रुपयांपर्यंत होईल. इथे अनेक ऐतिहासिक स्थळं आहेत जी दिवसभर तुम्ही पाहू शकता.