

भरपूर कालावधीसाठी एकाच ठिकाणी बंदिस्त झाल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या बळावतात. विशेषत: कपल्ससाठी हे खूप आव्हानात्मक ठरू शकतं. जेव्हा दोन वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती एका ठिकाणी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये वाद हे होतातच.


लॉकडाऊनमध्ये जसं घरात राहिल्याने तुमची चिडचिड होते आहे, तुम्ही तणावात आहात तशीच परिस्थिती तुमच्या जोडीदाराचीही आहे हे समजून घ्या. शांतपणे बोला. तुम्ही एकमेकांची काळजी घेऊ शकता. राग धरून एकाच ठिकाणी राहणं योग्य नाही.


तुम्ही बाहेरील लोकांच्या संपर्कात कमी आहात. अशावेळी राग आला, चिडचिड झाली तर त्यासाठी जोडीदाराला जबाबदार धरू नका किंवा त्याच्यावर राग काढू नका. असं का होत आहे, याचा शांतपणे विचार करा. थोडा वेळ घ्या आणि त्यातून मार्ग काढा.


रोमँटिक क्षण जगण्यासाठी घरातल्या घरातच एक नाइट डेट ठरवा. आपल्या जुन्या चांगल्या आठवणी आठवा. दोघंही एकमेकांसह छान वेळ घालवा, जो आतापर्यंत बिझी शेड्युलमुळे तुम्हाला मिळाला नव्हता.