Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


खाज येणे - चेहऱ्याची त्वचा खूपच नाजूक असते. फेशिअलसाठी असलेल्या क्रीम या केमिकलयुक्त असू शकतात आणि अशा केमिकलयुक्त क्रीम त्वचेला हानी पोहोचवू शकतात. प्रत्येकाच्या त्वचेला ही क्रीम सूट होईल असं नाही. अशा क्रीम वापरल्याने त्वचेला खाज येऊ शकते.
2/ 6


त्वचा लालसर होणे - फेशिअल करताना चेहऱ्यावर स्क्रब आणि मसाज केला जातो. स्क्रबने जास्त मसजा केल्यास, तसंच चुकीचा मसाज केल्यास त्वचेला हानी पोहोचते. त्वचा लालसर पडते. शिवाय स्किन इन्फेक्शनही होऊ शकतं.
3/ 6


पिंपल्स - फेशिअल केल्यानंतर चेहऱ्याच्या त्वचेवरील छिद्र खुली होतात. त्यामुळे त्वचा जर ऑईली असेल तर फेशिअल केल्यानंतर त्वचेवर पिंपल्स येतात.
4/ 6


स्किन अॅलर्जी - फेशिअल करताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरले जातात. यामुळे स्किन अॅलर्जीचा धोका वाढतो.