

सोशल मीडियामध्ये सर्व भावना व्यक्त करण्यासाठी सध्या इमोजीचा वापर केला जातो. काय करतोय? कसं चाललंय? किंवा साध्या प्रश्नांना देखील आता इमोजीचा वापर केला जातो. म्हणजेच काय तर, कमी शब्दात जास्त भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी बेस्ट!


आत्तापर्यंत शेकडो इमोजी होत्या. पण पारियड्सच्या ( मासिक पाळी ) इमोजीचा समावेश नव्हता. पण, आता पीरियड्सकरता देखील एका नव्या इमोजीचा समावेश करण्यात आला आहे.


इमोजी 12.0 फायनल झाली आहे. ज्यामध्ये 59 नव्या इमोजींचा समावेश आहे. त्यामध्ये वेग-वेगळ्या इमोजी मिळून आता 171 नव्या इमोजी येणार आहे. थोडक्यात सांगायचं तर 230 नव्या इमोजी आता तुम्हाला वापरता येणार आहेत.


वोग पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, पीरियड्सच्या इमोजीकरता तब्बल 55 हजारापेक्षा जास्त लोकांनी मागणी केली होती. याचं नेतृत्व ग्लोबल गर्ल राईट्स चॅरिटी प्लॅन इंटरनॅशनल युके या संस्थेनं केलं होतं.