

आपण लहानपणापासून अॅन अॅपल अ डे किप्स द डॉक्टर अवे हा इंग्रजीतील वाकप्रचार ऐकलाच आहे. पण तुम्हाला माहीत आहे का हीच गोष्ट फक्त सफरचंदासोबत केळ्यालाही लागू होते. किंबहूना दररोज दोन केळी खाण्याचे फायदे हे जास्त आहेत. आज आम्ही तुम्हाला याच केळ्याचे फायदे सांगणार आहोत.


केळ्यात अनेक प्रकारचे विटामिन असतात. नियमित केळं खाल्ल्याने विटामिन सीची कमतरता तर कमी होतेच शिवाय विटामिन बी6 आणि विटामिन सी हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला जेवढी विटामिन सी ची आवश्यकता असते त्यातील 15 टक्के विटामिन हे फक्त केळ्यातून मिळू शकतं.


केळ्यात मोठ्या प्रमाणात आयन ही असतं. त्यामुळे अॅनेमियापासून वाचण्यासाठी केळं फार उपयुक्त आहे. अॅनेमियात शरीरातील लाल पेशी आणि हीमोग्लोबिनचा स्तर कमी होतो.


केळ्यात असलेले विटामिन बी6 हे शरीरातील ग्लुकोजची मात्रा नियंंत्रणात राहायला मदत होते. अॅनेमियाच्या रुग्णांना यामुळे फार आराम मिळतो.