अंड्यातून शरीराला प्रोटिन मिळतं, त्याचं रुपांतर अलब्युमिनमध्ये होतं. अलब्युमिन शरीराच्या बहुतेक गरजा पूर्ण करतं तसंच प्रोटीन शरीरातील पेशींना निरोगी ठेवतात. सामान्य परिस्थितीत एक ते दोन अंडी खाणं हे शरीराच्या दृष्टीनं आवश्यक आहे. काहीवेळा बर्याच कारणांमुळे प्रोटीनची कमतरता होते. यकृत, मूत्रपिंड किंवा आतडं कमकुवत असल्यास प्रोटीन मिळण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
खाजगी रुग्णालयातील वरिष्ठ सल्लागार डॉ. श्रीकांत शर्मा म्हणाले, एकाच वेळी भरपूर अंडी खाल्ल्यामुळे इसोफेगसवर दबाव येतो. त्यामुळे ते प्रसरण पावतं आणि रक्तस्राव सुरू होतो त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. तसंच अंडी आणि अल्कोहल एकत्रितपणे घेत असताना पोटावरती जास्त दबाव येतो आणि त्यामुळेच पोटातील इतर अवयव खराब होण्यास सुरुवात होते आणि मृत्यू ओढावतो.
तसं पाहायला गेलं तर प्रोटीनयुक्त अंडी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. ही पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. तसंच अंडी खायला उष्ण असतात म्हणूनच बरेच लोक हिवाळ्यामध्ये आपल्या आहारात अंड्यांचा समावेश जास्त प्रमाणात करतात. अंड्यांमध्ये नऊ प्रकारचे अमिनो ॲसिडस असत्यात ए, बी, बी3, डी, ई फॉलेट, सेलेनियम आणि ओमेगा-3 जीवनसत्वं असतात.
दररोज दोन अंडी खाणं मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. अंड्यामध्ये असलेले ओमेगा-3 जीवनसत्व आणि फॅटी ॲसिड मेंदूसाठी खूप फायदेशीर असतं. त्यात कोलीन असते त्यामुळेच स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते. मेंदू अधिक चांगलं कार्य करण्यास सक्षम होतो. तसंच अंड्यामध्ये असलेला व्हिटॅमिन बी 12 हा तणाव दूर करण्यासाठी मदत करतो.
अँझाइना हा छातीत दुखण्याचा एक प्रकार आहे. हृदयात रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे हा होऊ शकतो. अँझाइना झालेली ही व्यक्ती एगमॅन म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांचं खरं नाव एलेक्सिस सेंट मार्टिन. त्यांच्यावर कोलोरॅडो स्कूल ऑफ मेडिसीन विद्यापीठातील गॅस्ट्रोइंडॉलॉजिस्ट फ्रेड ज्युनियर यांनी संशोधनही केलं होतं.
1822 मध्ये मार्टिनला चुकून त्याच्या पोटात गोळी लागली शस्त्रक्रियेनंतर त्याने डॉक्टर फ्रेड केर्न यांना त्याने स्वतःवर प्रयोग करण्याची परवानगी दिली. या संशोधनात फ्रेंडने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळीवर कसा प्रभाव पडतो हे पाहिले. या चाचण्यांमध्ये रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त दाखवलं गेलं.(फोटो सौजन्य - wiki)
अंड्याचा पांढरा भाग हा फॅट आणि कोलेस्ट्रॉल फ्री आहे. आहारात प्रोटीन घेण्यासाठी अंडी हा एक चांगला पर्याय आहे. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये अंड्यातील पिवळ्या भागापेक्षा किंचित जास्त प्रथिनं असतात. 100 ग्रॅम अंड्याच्या पिवळ्या भागात एकूण 11 ग्रॅम तर पांढर्या भागात 16 ग्रॅम प्रोटीन असतं. तसंच रोज एक अंडं खाल्ल्याने शरीराला सुमारे पाच टक्के प्रोटीन मिळतं.