

डॉक्टर्सचं म्हणणं आहे की, रोज एक सफरचंद खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होतं नाही. रोज एक सफरचंद आपल्याला आजरांपासून दूर ठेवतं असं नेहमी म्हटलं जातं. पण सफरचंद खाणं मायग्रेन सारख्या गंभीर आजारांसाठी उपयुक्त असतं. जाणून घेऊया सफरचंदाचे माहीत नसलले काही फायदे...


मधुमेहाच्या रुग्णांना रोज एक सफरचंद खाणं खूपच फायदेशीर ठरतं. सफरचंदातील पेक्टिन मधुमेहींच्या शरीरातील ग्लाक्ट्रोनिक अॅसिडची कमतरता भरुन काढतं आणि इन्सुलिनची मात्रा कमी करतं.


पोटाच्या विकार असलेल्या लोकांनी नियमित एक सफरचंद खाल्ल्याने फायदा होतो. साल न काढता खाल्लेलं सफरचंद कफ कमी होण्यास मदत होते. सफरचंदातील फायबर कॉलेस्ट्रॉल कमी करतं.


कापलेलं सफरचंद रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवून आणि मग सकाळी हे सफरचंद रिकाम्या पोटी खाल्ल्यास मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यावर फायदेशीर ठरतं.


सफरचंदात आयर्नचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणूनच कापून बराचवेळ ठेवल्यास ते काळं पडतं. ज्याच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी असतं. त्यांनी रोज सफरचंदाचा ज्यूस प्यायल्यास जास्त फायदेशीर ठरतं.


तुम्ही दिवसातून 2-3 सफरचंद खात असाल तर संपूर्ण दिवसभर तुमच्या शरीराला आवश्यक असलेला आयर्न या सफरचंदातून पुरवला जातो.