अनेकांना रात्री उशीरा झोप येते. यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. याचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिवसभर राहतो.
2/ 8
अपुऱ्या झोपेमुळे फक्त दिवसच खराब जातो असे नाही तर अनेक आजार बळावतात. त्यामुळे वेळीच या गोष्टीकडे लक्ष देऊन शरीराला पुरेशी झोप मिळण्याचे प्रयत्न करावे.
3/ 8
काही गोष्टी आपल्या डाएटमध्ये समाविष्ट केल्याने शरीराला योग्य अशी झोप मिळण्यास मदत होते आणि संपूर्ण दिवसही उत्साहात जातो.
4/ 8
यासाठी आहारात थोडेसे बदल केले तरी आपल्याला हवी असलेली शांत झोप मिळू शकते.
5/ 8
दररोज बदाम खाल्याने झोप नियमित व्हायला मदत होते. बदामामुळे मेलाटोनिन हे हार्मोन संतुलित होते.
6/ 8
केळ्यामुळेही चांगली झोप येते. याशिवाय डाएटमध्ये मधाचाही वापर करा.
7/ 8
दुग्धजन्य पदार्थ अधिक खाण्यावर भर द्या. दुधाच्या पदार्थांमुळे मेंदूत मेलाटोनिन हार्मोन तयार व्हायला मदत होते. यामुळे निवांत झोप येते. तसेच झोपण्यापूर्वी दररोज एक मुठ चेरी खायला विसरू नका.
8/ 8
जेवणात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या असतील याकडे लक्ष असू द्या. हिरव्या भाज्यांमध्ये असणारे मॅग्नेशियममुळे झोप चांगली लागते.