Drug Resistant Malaria: आफ्रिकेत नव्या भयंकर स्वरूपाच्या मलेरियाचा कहर; औषधालाही जुमानत नाही आजार
आफ्रिकेत Drug Resistant मलेरिया या घातक आजाराच्या मोठ्या प्रमाणात केसेस सापडत आहेत. त्यामुळे आफ्रिकन (African Country) देशांमध्ये हाहाकार उडाला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे जगात सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मलेरियाचे औषध रुग्णांवर कुचकामी ठरत आहे.
युगांडामध्ये मलेरियाच्या रूग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते त्यात लोकांना या रोगाची लागण झपाट्याने होत असल्याची माहिती समोर आली आहे.
2/ 4
आफ्रिकेत या नव्या रोगाचा उदय होणं ही जगासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. आधीच जगभरात कोरोना विषाणूमुळे लोकांना साथरोगाचा सामवा करावा लागत आहे.
3/ 4
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये (New England Journal of Medicine) बुधवारी प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे की हा रोग आता संपूर्ण आफ्रिकेसह जगभरात पसरू शकतो.
4/ 4
डासांमुळे मलेरिया पसरतो. समोर आलेल्या आकडेवारीनुसार आफ्रिकेत मलेरियामुळे दरवर्षी 4 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. 5 वर्षांखालील मुले आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका असतो.