Green Tree Hut: बाभळीच्या झाडावर स्वप्नातलं घर, पाहा युवकाची भन्नाट कल्पकता
परदेशातले ट्री हाउसचे फोटो पाहून आपल्या बाभळीच्या झाडावर हवेशीर झोपडी बनवण्याचा विचार राजस्थानच्या वाळवंटात राहणाऱ्या फुसारामच्या सुपिक डोक्यात आला आणि...
|
1/ 5
एखाद्या Eco Friendly Resort मध्ये महागड्या Green Tree House सारखं वाटतंय ना हे... पण हे आहे बाभळीच्या झाडावरचं घर. राजस्थानच्या वाळवंटात राहणाऱ्या युवकाच्या सुपीक डोक्यातून आलेली भन्नाट कल्पना...
2/ 5
राजस्थानमधल्या बिकानेर इथल्या पांचू गावात राहणाऱ्या फुसाराम नायक यानं बाभळीच्या झाडावर एक ग्रीन ट्री हट बनवली आहे. या झोपडीत सामान्य घरांप्रमाणे खिडकी, दरवाजांसारख्या सर्व वस्तू आहेत.
3/ 5
तीन वर्षांपूर्वी फुसाराम यानं ट्री हाउस बनवण्याचं काम सुरू केलं होतं. दररोज सकाळी दोन तास बाभळीच्या झाडाची छाटणी करत होता. त्याला झोपडीसारखा आकार देण्यासाठी याच क्रमानं तो काम करत राहिला. आता कुठं त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
4/ 5
फुसारामनं परदेशातले ट्री हाउसचे फोटो पाहून यावर झोपडी बनवण्याचा विचार केला. या झोपडीला शेणानं सारवलं आहे. आपलं हे स्वप्नातलं घर बनवण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली.
5/ 5
15 फूट उंचीच्या या ग्रीन हटमध्ये एका वेळी 6 लोकं बसू शकतात. झोपडीमध्ये हवेसाठी खिडक्या आणि दरवाजे आहेत. हवेमुळे उडू नये यासाठी चारही बाजूनं त्याला लोखंडी तारांनी बांधले आहे. ही झोपडी आता पूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाली आहे.