फळं जास्त वेळ टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवताय; होतील वाईट परिणाम
फळं जास्त टिकावीत म्हणून फ्रिजमध्ये ठेवत असाल तर, आधी या गोष्टींची माहिती घ्या.
|
1/ 7
उष्णता वाढल्यामुळे पदार्थ खराब होणं प्रत्येक गृहिणीसाठी तापदाक ठरतं. त्यावेळी भाज्या, फळं, दूध किंवा शिजलेले पदार्थ टिकवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र काही फळं चुकूनही फ्रिज मध्ये ठेवू नयेत.
2/ 7
फ्रिजमध्ये फळं ठेवल्याने त्यांची चवही बदलते आणि त्यातील पोषक घटकही कमी होतात. उन्हाळ्याच कलिंगड, आंबा केळी यासारखी फळं फ्रिजमध्ये ठेवू नयेत.
3/ 7
आंबा आणि कलिंगड उन्हाळ्यात जास्त खाल्ले जातात. पण, ही फळं कापल्यानंतर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नयेत. कलिंगडात मोठ्या प्रमाणात ऍन्टीऑक्सिडंट असतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातलं ऍन्टीऑक्सिडंटचा नाश होतो.
4/ 7
आंब्यामध्ये व्हिटॅमीन सी, बिटाकॅरेटीन,ऍन्टीऑक्सिडंट असतं. कापलेला आंबा फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक संपतात.
5/ 7
केळं फ्रिजमध्ये ठेवू नयेत. केळ्याच्या देठामधून इथाईलीन नावाचा गॅस बाहेर पडतो. त्यामुळे फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात.
6/ 7
संत्री आणि लिंबामध्ये सायट्रीक ऍसिड असतं. त्यामुळे फ्रिजमध्ये टिकत नाहीत. त्यातील रसही कमी होतो.
7/ 7
उन्हाळ्याच लीची बाजारात येतात. त्यावेळी आपण भरपूर लीची घरी आणतो. पण लीची कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण, त्यावरची टरफलं वेगळी होतात आणि लीची खराब होतात.