

बिअर पार्टी करायची म्हटलं की मित्रमैत्रिणी आलेच. त्यांच्याशिवाय या पार्टीची मजाच काय? मात्र समजा अशीच पार्टी तुम्हाला तुमच्या लाडक्या डॉगीसह करायला मिळाली तर?


तुम्ही फक्त मित्रमैत्रिणीच नाही तर तुमच्या कुत्र्यासहदेखील बिअर पार्टी करू शकता. कारण आता त्यांच्यासाठीही खास बिअर आली आहे.


Busch Beer या ब्रँडने खास कुत्र्यांसाठी डॉग बिअर तयार केली आहे. कंपनीने याबाबत आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य - Busch Beer Instagram)


डॉग बिअरमध्ये अल्कोहोल नाही. विशेष म्हणजे कुत्र्यांसाठी ती हेल्दी आहे. कारण त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये bone broth आहे.(फोटो सौजन्य - Busch Beer Instagram)


कंट्री लिव्हिंगमधील रिपोर्टनुसार Busch Beer ब्रँडचे डॅनिअल ब्लेक यांनी सांगितलं, आमच्या ग्राहकांना आम्हाला त्यांच्या बेस्ट फ्रेंडसह Busch brew पार्टी करण्याची संधी द्यायची होती.


सोशल मीडियावर कंपनीने Dog Busch brew ची घोषणा करताच अनेक प्राणीप्रेमींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.