

अनेक जण झोपेत स्वप्न पाहतात. अनेकांना स्वप्नात काही धक्कादायक देखील दिसून येतं. त्यानंतर आपण दिवसभर याचा अर्थ काय? याच विचारात असतो.


बंद खोलीत असल्याचं स्वप्न तुम्हाला पडत असेल तर, खूप दिवसांपासून तुम्ही काहीतरी शोधताय पण, तुम्हाला ते अद्याप मिळालेलं नाही असा अर्थ होतो.


तुमच्या स्वप्नात सतत खाण्याचे पदार्थ येतात? तर मग ही आनंदाची बाब आहे. कारण, तुम्हाला काहीतरी मोठा फायदा होणार आहे. विशेषता नोकरीमध्ये.


तुम्हाला जर का न्यूड असल्याचं स्वप्न पडत आहे. तर, तुम्ही स्वत:ला ओळखू शकलात नाही. तुम्ही तुमच्या सत्यापासून दूर आहात.


तुम्ही उंचावरून खाली पडत असल्याचं स्वप्न पाहात असाल तर त्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे तुम्ही उंचावरून पडत आहात म्हणजे खूश आहात. किंवा तुम्ही कोणत्यातरी चिंतेत आहात असा दुसरा.


जर तुमच्या मृत्यूचं स्वप्न तुम्हाला पडत आहे याचा अर्थ तुम्ही नोकरी, जुन्या आठवणी किंवा नातं संपवू पाहत आहात.