

सिनेमातल्या गाण्यांपासून ते कविता आणि गझलांपर्यंत सगळीकडेच पावसाचं कौतुक होतं. पावसाळ्यातलं रोमॅण्टिक वातावरण सगळ्यांनाच प्रेमाची गोड चाहूल देऊन जातं. पण हा पाऊस मुसळधार आहे त्यामुळे तो तुमची साथ कधी सोडेल याचा नेम नाही. या रोमॅण्टिक वातावरणात तुम्ही कधी आजारी पडाल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हवी.


पावसातल्या पाण्यात अनेक किटाणू असतात. त्यापासून आपला बचाव करण्यासाठी स्वच्छ राहणं फार महत्वाचं आहे. त्यातही तुम्ही जर प्रियकरासोबत डेटवर जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर पावसातल्या या आजारांपासून वेळीच सावध रहा. पुढील काही टीप्सच्या वापराने तुम्ही बिनधास्त होऊन या रोमॅण्टिक वातावरणाचा आनंद घेऊ शकता.


पावसात भिजल्यानंतर आंघोळ करणं महत्वाचं- पावसाचे थेंब अंगावर झेलायला आपल्या खूप आवडतं पण भिजल्यानंतर आंघोळ करायला विसरु नका. त्याने 80% रोगराई नष्ट होते.


केसांची काळजी घ्या- पावसाच्या पाण्याने आणि त्यात असणाऱ्या काही विषाणूंमुळे आपले केस खराब होतात आणि केस गळतीही होते. या वातावरणात केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी केसांना शॅम्पू आणि कंडीशन करा.


त्वचा आणि नखांची काळजी घ्या- मान्सूनच्या काळात चेहऱ्याला स्क्रबिंग केल्याने चेहरा साफ तर होईलचं पण त्याबरोबर तुम्ही सुंदरही दिसाल. त्यामुळे डेटवर जाण्याआधी स्क्रबिंग करायला विसरू नका. त्यात जर तुमची त्वचा तेलकट असेल तर चेहरा वारंवार टिश्यू पेपरने साफ करत रहा.


सॅनिटायझर नेहमी सोबत ठेवा- पावसाळ्यात सहज रोगराईशी संपर्क होतो. ज्याने सर्दी, खोकला, ताप असे संसर्गजन्य आजार होतात. या आजाराने आपला पार्टनरही आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत बाहेर जाताना सॅनिटायझरचा वापर करा.


पेडिक्युअर जरूर करा- पायांची योग्य निगा राखली अर्थात वेळोवेळी पेडिक्युअर केलं तर त्याने पायांना होणाऱ्या इनफेक्शनपासून रक्षण करू शकता. पावसाळ्यात पायांना दुर्गंध येतो त्याला टाळण्यासाठी टॅलकम पावडरचा वापर करा.