

जर तुम्ही तुमच्या मुलांना बाजारात सहज मिळणारे बंद बाटलीतले फ्रूट ज्यूस पिऊ घालत असला तर सावधान. कारण, अशा पॅकेज फ्रूड ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण सर्वाधिक असते आणि पोषण तत्त्वाचे प्रमाणही फार कमी असते. जे तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.


'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका संशोधनामध्ये याबाबतचा गंभीर खुलासा करण्यात आला आहे. अशा या फ्रूट ज्यूसचा थेट मुलांच्या डोक्यावर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना असे पॅकेज फ्रूट ज्यूस देऊन नये, असा सल्ला दिला आहे.


या रिपोर्टमध्ये अमेरिकेत विक्री होणाऱ्या 45 टक्के लोकप्रिय उत्पादनांची तपासणी करण्यात आली असता यामध्ये Cadmium, Organic Arsenic आणि Mercury चे प्रमाण अधिक सापडले आहे.


या संशोधनामध्ये ज्या ब्रँडचा उत्पादनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये धातूचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळले आहे


या संशोधनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, तुमचे वय कितीही असले तरी अशा प्रकारचे ज्यूस शरीरासाठी अपायकारक आहे. या फ्रूट ज्यूसमधून धातूचे प्रमाण कमी करणे हे अशक्य आहे. काही उत्पादनांमध्ये पॅकिंग करते समयी अथवा उत्पादन तयार करते वेळी चुकीच्या पद्धतीमुळे विषारी द्रव्य यात मिसळली जातात, जे तुमच्या प्रकृतीस घातक आहे.


फ्रूट ज्यूस तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये जेव्हा हे ज्यूस पॅकिंग केले जाते. तेव्हा, यामध्ये टॉक्सिन्स सोबत येऊन जातात. धातू असणे हे चिंतेचं कारण तर आहेच पण यामध्ये इतर घटकांचा समावेश असल्यामुळे मुलांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात.


धातूचे प्रमाणे जास्त असल्यामुळे याचा परिणाम थेट मुलांच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर होतो. या संशोधनामध्ये द्राक्षाचे ज्यूसमध्ये सर्वाधिक धातूचे प्रमाण अधिक आढळले आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे उत्पादन घेतले तरी त्यापेक्षा इतर दुसरे ब्रँडचे उत्पादनही तेवढेच अपायकारक आहे.