बाजारात सहजपणे मिळणारी पपई आरोग्यासाठी फायदेशीर असल्यामुळे बरेच जण आवडीने खातात. पपईमध्ये फायबरची मात्र जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. पपई मधल्या व्हिटॅमीन ए मुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तर पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी देखील डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात.