ग्राहक, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, कंपन्या आणि दुकानदार सर्वजण दिवाळीची वाट पाहत आहेत. काही लोक दिवाळीला वस्तूंची विक्री करुन तर काही खरेदी करून आनंदी असतात. लोक दिवाळीची खरेदी अनेक दिवस आधीच सुरू करतात. काही लोकांसाठी दिवाळी म्हणजे खाणे, पिणे आणि भरपूर खरेदी करणे. तुम्ही पण हे सर्व करणार असाल तर तुमच्या खिशाची काळजी घ्या. जर तुम्हालाही दिवाळीची खरेदी छान करायची असेल, पण पैसे थोडे कमी असतील, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आज आम्ही तुम्हाला स्मार्ट शॉपिंगचे चार मंत्र देणार आहोत.
बजेट बनवा, पैसे वाचवा : सणासुदीच्या खरेदीसाठी बजेट बनवणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला किती खर्च करायचा आहे आणि कोणत्या गोष्टींवर तुम्हाला खर्च करायचा आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. बजेट नसल्यास अवाजवी खर्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील अत्यावश्यक वस्तूंवर किती पैसे खर्च करायचे आणि मिठाई किंवा उत्सवावर किती खर्च होईल हे आधीच ठरवून घ्या. यामुळे तुमचे खूप पैसे वाचतील.
ऑफर्स समजून घ्या: दिवाळी ऑफर्सने भरलेली आहे. विशेषत: ऑनलाइन शॉपिंगवर ऑफर्सचा मोठा गाजावाजा असतो. परंतु, कोणत्याही ऑफरचा लाभ घेण्यापूर्वी, थोडा अभ्यास करा. सहसा असे घडते की ऑफर दिसतात तितक्या आकर्षक नसतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरही सणासुदीच्या ऑफर्स येतात. त्यामुळे तुमच्याकडे असलेली कार्डे, त्यावर कोणत्या ऑफर्स सुरू आहेत, याची माहिती जरूर ठेवा. तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कार्ड असल्यास त्यांच्या ऑफरची तुलना करा.
विनाकारण कर्ज घेऊ नका: लोक अनेकदा जास्त-किंमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतात. वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो. म्हणून ऑफर्समध्ये वस्तू कमी किमतीत मिळत असल्याने ती कर्ज काढून घेतल्यास महाग पडते. अशा डिलमध्ये तुमची कोणतीही बचत होत नाही. त्यामुळे शक्यतो कर्जाऐवजी क्रेडिट कार्डने ईएमआयवर खरेदी करा. खर्या अर्थाने तरच तुमचे पैसे वाचतील.
बाजारात जा: फक्त ऑनलाइन खरेदी करू नका. बाजारात पण जा. काही बाजारात स्वस्त मिळत असतील तर तिथूनच घ्या. यासोबतच कुठून खरेदी करायची हेही ठरवायला हवे. आपल्या आवडत्या स्टोअर किंवा वेबसाइटवर लक्ष ठेवावे. ऑफर कुठे सुरू आहे याची माहिती तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील.